संस्कृत श्लोक

Hanuman | हनुमंताची आरती | Aarti of Hanuman 1

हनुमंताची आरती | Aarti of Hanuman

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं

करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं

कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं

सुरवर, नर, निशाचर*

त्या झाल्या पळणी

जय देव जय देव जय जय हनुमंता

तुमचेनि प्रतापे भिये कृतान्ता ॥धृ०

दुमदुमली पाताळें उठला पडशब्द

धगधगिला धरणीधर मानिला खेद

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद

रामीं रामदासा शक्तीचा शोध

– समर्थ रामदासस्वामी

REF :- बालसंस्कार

श्रीकृष्णाची आरती | Aarti of Shri Krishna | 

Exit mobile version